अनिरुद्ध महेश गांधी I #vijayeebhava

4 Views
Published
C17002
किशोरी थियेटर्स (रजी.) आणि विजयी भव..आयोजित,कला गुण स्पर्धा... जागर कला गुणांचा...
आपण सर्वच कलाकार मंडळी ह्या काळात Lockdown आहोत.. पण कला कधीही Lockdown होऊ शकत नाही.. ती सतत आपल्या प्रेक्षकांना शोधत असते.. त्याच कलेचा मान ठेवण्यासाठी किशोरी थियेटर्स (रजी.) आणि विजयी भव सदर स्पर्धा आयोजित करत आहोत, तरी सर्व कलाकारांनी उत्तम प्रतिसाद द्यावा.

प्रवेश विनामूल्य आहे

स्पर्धेमध्ये उमेदवार अभिनय , नृत्य व गायन सादर करू शकतो..

स्पर्धेच्या अटी
1.स्पर्धेसाठी वयाची अट नाही.
2.स्पर्धेचा विषय खुला राहील
3.स्पर्धेसाठी एकपात्री अभिनय मोबाईलवर शूट करून पाठवावा.
4. व्हिडिओ चा कालावधी १-५ मिनिटेच असावा..
5.स्पर्धेसाठी व्हिडिओ (1920/1080) हरीझोंटल फाॅरमॅट मध्ये shoot करावा.
6. video /Audio ला Quality असायला हवी (अन्यथा व्हिडिओ स्विकारला जाणार नाही).
7. व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे संगीत (copyright music) वापरू नये.(स्वतःचे वाद्य वापरू शकता पण karaoke चालणार नाही.)
8. स्पर्धेसाठी पात्र असलेल्या कलाकारांचे व्हिडिओ प्रोडक्शन च्या चॅनेलवर अपलोड केले जातील.
9. व्हिडिओ हे खाली दिलेल्या whatsapp नंबर वर वर सेंड करावेत.
10. पाठविलेला व्हिडिओ हा इतर कुठेच share आणि upload केलेला नसावा.
11. Tiktok चे‌ व्हिडिओ स्विकारले जाणार नाही.
12 व्हिडिओ मराठी व हिंदी भाषेतील असावा.
13. व्हिडिओ एडिट केलेला नसावा.
14. स्पर्धकांनी आपलं नाव,पत्ता ,वय, मोबाईल नंबर व ई-मेल नमूद करण अनिवार्य आहे (व्हिडिओ सेंड करताना माहिती द्यावी व्हिडिओ मध्ये नसेल तरी चालेल ).
15. सदर स्पर्धेचा निकाल हा 31 मे 2020 ला जाहीर करण्यात येईल. व्हिडिओ २८ मे पर्यंतच स्विकारले जातील ह्याची नोंद घ्यावी.
16. विजेत्यांना पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र आणि रोख रक्कम दिली जाईल.
17. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
18. स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करायचा अधिकार संस्थे कडेच राहील.
19. सर्व उमेदवारांना स्पर्धेत सहभागी झाल्या बद्दल प्रमाणपत्र ऑनलाईन मैल द्वारे देण्यात येईल..
20. विजेत्यांचा सत्कार समारंभ हा lockdown नंतर एक दिवस ठरवून सरकारच्या lockdown नियमानुसार केला जाईल.. त्या संबंधी माहिती त्यांना पोहचवली जाईल.

टीप:
1.सर्व उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की बक्षीस महत्वाचे नाही.. ते एक स्पर्धेचे स्वरूप आहे.. महत्व हे केवळ तुमच्या कलेला आहे..
Category
नृत्य
Be the first to comment